कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील सर्व ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी एकत्रित येत रामदास दरेकर यांची मनसे पुणे जिल्हाध्यक्ष पदी राज ठाकरे यांच्या हस्ते निवड झाल्याने ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी रामदास दरेकर यांचा मोठ्या उत्साहात सत्कार केला.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील सुपुत्राला राज ठाकरे यांनी मोठी संधी दिली असून याबाबत सणसवाडी ग्रामस्थांना आनंद व कौतुक असल्याने सर्वांनी एकत्र येत रामदास दरेकर यांचा सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सणसवाडी गावच्या सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, माजी संचालक दत्तात्रय पठाणराव हरगुडे ,माजी सरपंच युवराज दरेकर, कॉंग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष वैभव यादव माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर ,माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर ,माजी सरपंच संगिता नवनाथ हरगुडे माजी सरपंच स्नेहल राजेश भुजबळ,माजी उपसरपंच विजयराज दरेकर माझी उपसरपंच सागर दरेकर, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर ,अक्षय कानडे , रूपाली दरेकर, शशिकला सातपुते, तनुजा दरेकर, ललिता दरेकर ,माजी चेअरमन सुहास दरेकर माजी उपसरपंच नवनाथ भुजबळ , नवनाथ हरगुडे, उद्योजक रामदास दरेकर, संतोष दरेकर, दगडु दरेकर, सुखदेव दरेकर, ॲड श्रीधर हरगुडे, हनुमंत दरेकर, अनिल गोटे, शिवाजी हरगुडे मान्यवर उपस्थित होते.
मनसे नेते राज ठाकरे साहेब व मनसे पक्षाने मोठ्या विश्वासाने मला काम करण्याची संधी दिली असून त्यांचा मी ऋणी आहे.पुणे जिल्ह्यातील मित्र परिवार, कार्यकर्ते व सणसवाडी गावातील सर्व पदाधिकारी,ग्रा मस्थ नातेवाईक, पै.पाहुणे यांनी जो सत्कार केला व भविष्यातील वाटचालीसाठी ज्या शुभेच्छा दिल्या त्या प्रेरणादायी व अविस्मरणीय आहे. पदाच्या माध्यमांतून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा व सणसवाडी गावच्या नावलौकिक वाढवण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहे. – नवनिर्वाचित मनसे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर