कोरेगाव भीमा – बिवरी ( ता.हवेली) ग्राम नगरीच्या सरपंचपदी शुभांगी संदिप गोते यांची बिनविरोध निवड झाल्याने शिरूर तालुक्यातील उद्योगनगरी सणसवाडी गावची कन्या बिवरी ग्राम पंचायतीचा कारभार पाहणार आहे.
सणसवाडीच्या कन्येची बिवरी गावच्या सरपंच पदी बिनविरोध निदवड होताच सणसवाडी ग्रामस्थांनी जल्लोष युक्त आनंद व्यक्त करत फटाकड्यांची आतषबाजी करण्यात आली.

बिवरी गावच्या नवनिर्वाचित सरपंच शुभांगी संदिप गोते यांचे माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, माजी सरपंच आण्णासाहेब दरेकर,माजी चेअरमन सुहास दरेकर, माजी उपसरपंच नितीन गव्हाणे, अशोक ढेरंगे , सुभाष दरेकर, प्रशांत दरेकर, निलेश दरेकर, ग्रामपंचायत सदस्या ललिता दरेकर, सुनिता दरेकर, राणी हरगुडे, वंदना दरेकर, शाम दरेकर, गणेश दरेकर,अमोल दरेकर, बाळकृष्ण दरेकर,प्रा. अनिल गोटे ,उद्योजक सुरेश शेवाळे या मान्यवरांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.

सणसवाडी गावाची सुकन्या शुभांगी संदिप गोते यांची बिवरी गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने अत्यंत आनंद होत असून सणसवाडी गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लावला गेला असून बिवरी गावची सर्वांगी प्रगती व्हावी व सरपंच शुभांगी गोते यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. – पंडित दरेकर, माजी सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती