
कोरेगाव भीमा -दिनांक २० जून
कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील श्री छत्रपती संभाजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या वातावरणामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी योग दिन साजरा केला. यावेळी सूर्यनमस्कार व इतर योगासने करण्यात आली. भारतीय संस्कृतीतील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या योगामुळे माणसाचे मन शरीर निरोगी व सुदृढ राहते यासाठी योगाचे अत्यंत आवश्यकता आहे असे मत शाळेचे मुख्याध्यापक कुंभारकर सर यांनी व्यक्त केले.
योग दिनानिमित्त विद्यार्थी सकाळीच शाळेत दाखल झाले होते . सूर्योदयाच्या वेळी योगासने करण्यास सुरुवात झाली विद्यार्थी व शिक्षकांनी यामध्ये मोठ्या आनंदाने सहभाग नोंदवत योग दिन साजरा केला. यावेळी श्री छत्रपती संभाजी हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंद उपस्थित होते.