तळेगाव ढमढेरे (प्रतिनिधी)

श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता.शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी ज्योती अमोल गवारे यांची निवड करण्यात आली आहे. श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी ग्रामपंचायतिच्या उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच शंकर शिवाजी धुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामस्थांच्यावतीने नवनिर्वाचित उपसरपंच ज्योती गवारे यांचा सत्कार करण्यात आला.
सुनिता गवारे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक लागली होती. त्यामध्ये संतोष गायकवाड, लता संदिप गवारे, महेंद्र गवारे आणि ज्योती गवारे या चार सदस्यांनी उपसरपंच पदासाठी फॉर्म भरले होते. त्यामध्ये इतर तीन जणांनी माघार घेतल्यानंतर ज्योती गवारे या बिनविरोध उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आल्या. याप्रसंगी ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा वाळके, सविता चोरमले, उमा झोरे, सागर ढमढेरे, कोमल कातोरे, माजी सरपंच कांतीलाल गवारे, माजी उपसरपंच सोपान गवारे, माजी उपसरपंच काळूराम गवारे, माजी उपसरपंच बाळासाहेब गवारे, माजी सरपंच बाळासाहेब गवारे, राष्ट्रवादीचे सुनील गवारे, वीज वितरण नियंत्रण समितीचे सदस्य मधुकर दोरगे, भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे शिरूर तालुका उपाध्यक्ष अमोल गवारे, दिनकर गवारे, पांडुरंग गवारे, उत्तम गवारे, कैलास गवारे, अमोल गवारे, दीपक गवारे, राजेंद्र वाळके, बाळासाहेब चोरमले इत्यादी उपस्थित होते.