
प्रतिनिधी हेमंत पाटील कराड
उंब्रज -दिनांक १९फेब्रुवारी
उंब्रज( ता.कराड)संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती उत्साहात आणि जोशात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा मय वातावरणात अक्खा महाराष्ट्र दुमदुमून निघाला प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करत होता यातच उंब्रज ता कराड येथील शिवबा सामाजिक संस्थेतील छोट्या मावळ्यांनी शिवजयंती चे औचित्य साधून साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली त्यांनी उंब्रज बाजार पेठे मधील मध्यवर्ती ठिकाणी होत असलेल्या प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोळा फूट उंच पंचधातूच्या अश्वरुढ पुतळ्यास देणगी स्वरूपात ११,१११ रुपये रोख रक्कम शिव योद्धा प्रतिष्ठान उंब्रज यांच्याकडे सुपूर्त केली छ.शिवाजी महाराज यांच्या १६ फूट उंच पंचधातूच्या मूर्तीस प्रशासकिय मान्यता मिळाली असून लोकसहभागातून निधी संकलनाचे काम सुरु आहे. गत दोन वर्षात कोरोनाकाळात लॉकडाऊनच्या परिस्थितीतून बाजारपेठ व्यापारी शेतकरी स्थिरावत आहेत.या आर्थिक अडचणीच्या काळातही नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूतळ्यासाठी व आपल्या लाडक्या राजाच्या प्रेमापोटी नागरीक शिवप्रेमी व्यापारी शेतकरी नोकरदार तसेच सामाजिक संस्था गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळे भरभरून देणगी श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान यांचेकडे जमा करीत आहेत.अनेकजण वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस किंवा कोणतेही शुभकार्य असो या शिवकार्यासाठी देणगी देऊन साजरे करतात. शिवजयंतीचे औचित्य साधुन शिवबा सामाजिक संस्थेच्या छोट्या मावळ्यांनी होणारा वायफळ खर्च वाचवून उंब्रज बाजारपेठेत श्री. छ. शिवाजी महाराज यांचा भव्य व दिव्य अश्वारुढ पुतळा व्हावा या भावनेने रोख ११,१११ श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानकडे सुपूर्त केले. या छोट्या मावळ्यांनी केलेल्या लाखमोलाच्या देणगीचे व त्यांच्या वैचारीक कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.