मनमोहक बालरूपात चिमुकल्यांच्या रुपात अवतरला नंदलाल कान्हा, सोबत राधा, सवंगडी अवतरले बाललीला करत दहीहंडी फोडत कृष्णजन्माष्टमी मोठ्या आनंदाच्या व उत्साहाच्या, भक्तिमय वातावरणात साजरी
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथे बालरुपात अवघे गोकुळ अवतरले होते. बालरुपातील मनमोहक श्रीकृष्ण रुपात पिवळ्या पितंबरात लहान दुडूदुडु चालणारी चिमुकली पाऊले, हातात आकर्षक बाजूबंद, मनगट्या, डोळ्यात काजळ, गालावर दृष्ट लागू नये म्हणून काजलाचे तिट,डोक्यावर मोरपिसारा, हातात छोटीशी बासरी आणि गालावर खट्याळ गोजिरवाणे हसू ,सोबत धावणारी राधा गुलाबी छानश्या गुलाबी रंगाचा घागरा घातलेली व मागे सर्व गोकुळ अवतरावे तशा गौळणी सजलेल्या सोबत कृष्ण जन्माचे पोस्टर्स,आकर्षक हातात बासरी घेतलेली स्वागत कमान यामुळे विनर्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये अवघे गोकुळ,मथुरा आणि वृंदावन अवतरल्याचा आनंद होता.

कोरेगाव भीमा येथील नामांकित व दर्जेदार , गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी , विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी, पालकांच्या, विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मनातील आवडते व पहिल्या पसंतीचे स्कूल म्हणून नावलौकिक असलेल्या विनर्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा साजरा करण्यात आला.
