
कोरेगाव भीमा – दिनांक ५ फेब्रुवारी
१ जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या दंगलीतील हिंसाचारानंतर राज्य सरकारने या प्रकरणी नेमलेल्या कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या नेतृत्वाखालील चौकशी आयोग यांच्यासह सरकारी वकील व खाजगी वकील यांच्यासह विजय रण स्तंभ , वढू बुद्रुक येथे भेट देत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. कोरेगाव भीमा हिंसाचार चौकशी आयोगासमोर सादर करण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक व कागदोपत्री पुरावे यांच्यासह वस्तुतः तेथील परिसर यासह हिंसाचारात सहभागी असलेला जमाव कोठून कुठे आला ,हिंसाचार होण्यामागील परिस्थिती समजून घेण्यासाठी व गावातील परिस्थिती याची पडताळणी करण्यासाठी आयोगाने भेट दिली.
यावेळी विजय रण स्तंभ , वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी, छंदोगामात्य कवी कलश समाधी , गोविंद गोपाळ समाधी या ठिकाणी भेट देत पाहणी केली.यावेळी प्रत्येक ऐतिहासिक स्थळाचे अभ्यासपूर्ण पाहणी करण्यात आली. आवश्यक व महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यात आली.
गोविंद गोपाळ समाधी स्थळास भेट
वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी परिसर पाहणी केल्यानंतर गोविंद गोपाळ यांच्या समाधी स्थळाला भेट दिली असता पांडुरंग गायकवाड यांनी आपल्या समस्या मांडल्या त्यावेळी आयोगाने त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या तसेच गायकवाड यांना जे माहिती आहे त्याविषयी त्यांनी प्रतिज्ञापत्र करावे त्यामुळे बरीच परिस्थिती समजून येईल असे मत मांडण्यात आले .
द्विसदस्यिय समितीतील कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक साहेब यांच्यासह आयोगाचे वकील ॲड आशिष सातपुते ,विशेष सरकारी वकील ॲड .शिशिर हिरे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे,गलांडे सर ॲड .बी जी बनसोडे साक्षीदार वकील ,ॲड किरण चन्ने, ॲड मंगेश देशमुख ,ॲड राहुल मखरे , ॲड बरून कुमार, ॲड भोसले मॅडम, ॲड भाग्येशा कुरणे ,वढू बुद्रुक सरपंच सारिका शिवले, ग्राम पंचायत सदस्या अंजली शिवले,राहुल कुंभार ,ज्ञानेश्वर भंडारे,पोलीस पाटील जयसिंग भंडारे, माजी सरपंच अनिल शिवले,बापूसाहेब आहेर पांडुरंग गायकवाड, सनी गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.
आयोगाचे अध्यक्ष व इतर मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेत पुष्पहार अर्पण केला. यावेळी समाधी परिसरातील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ, कवी कलश समाधी, सभागृह , धर्मवीर संभाजी महाराज यांच्या समाधिसमोरील पाटी, गोविंद गोपाळ यांची समाधी परिसराची पाहणी करण्यात आली.
