
मिलिंदा पवार वडूज सातारा
सातारा – वडूज येथे आरंभ प्रशिक्षण केंद्राची सुरुवात अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात आली . लहान बालकांच्या दृष्टीने सुरुवातीचे शिक्षण ० ते ३ वर्ष वयोगटातील बालकांची वाढ आणि विकास या बद्दल विशेष प्रयत्न करणे गरजेचे असते यासाठी या आरंभ प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे .बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी लहान मुलांतील मानसिक बदल त्यांची आवड निवड व इतर गोष्टींच्या बाबत योग्य पद्धतीने अंगणवाडी सेविका यांना बहुमूल्य मार्गदर्शन .केले .लहान बालकांच्या मेंदूचा विकास या वयामध्ये जास्त प्रमाणात होतो . त्यासाठी पालकांचा व अंगणवाडी सेविकांच्या सहभाग हा महत्त्वाचा असतो . पालकांनी बालकांशी संवेदनशील रहावे तसेच सेविकेने वारंवार पालक भेटी माता सहभाग घेऊन त्यांना बालकांचा वाढ आणि विकास या मधला फरक लक्षात घ्यावा असे मत नगरसेविका रेश्मा बनसोडे यांनी व्यक्त केले.
यावेळी शोभा माळी , पर्यवेक्षीका एस आर काकडे , पूजा गायकवाड , संरक्षण अधिकारी आर के जाधव , राधिका गोडसे यांनी याबाबत आपले विचार व्यक्त केले. लहान बालकांना समजावून देऊन त्यांचा बौद्धिक विकास आणि वाढ बद्दल प्रयत्नशील राहण्यासाठी पालकांनी प्रयत्न करणे गरजेचे असते . हे पटवून देण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे . त्यासाठी हा एक चांगला आरंभ झाला आहे असे गौरवण्यात आले . पहिले सत्र – स्वागत आणि परिचय , दुसरे सत्र – पूर्वचाचणी . तिसरे सत्र – वाढ आणि विकास . चौथे सत्र – बाल विकास . पाचवे सत्र – संवेदनशील पालकत्व . सहावे सत्र – सुरक्षित वातावरण अशा पद्धतीने प्रशिक्षण केंद्रात जोमाने कार्याला सुरुवात झाली आहे .यावेळी वडूज नगर पंचायतीचे मान्यवर नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते प्रस्तावना काकडे व सोनम जगताप यांनी केले तर मंगल गोडसे यांनी आभार मानले