मिलिंदा पवार वडूज सातारा

वडूज – वडुज येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ भैरवनाथ महाराजांचा हळद,मिरवणूक ,पालकही सोहळा , महाप्रसादासह ,कुस्त्या ,सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यासह भैरवनाथ देवाच्या वार्षिक यात्रेस मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली आहे कोरोणा प्रादुर्भावामुळे ही यात्रा मागील दोन वर्षे आयोजित करण्यात आल्या नव्हत्या . यावर्षी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रोत्सव सात दिवस होणार आहे. यामध्ये श्रींच्या पालखीची मिरवणूक , श्री भैरवनाथ महाराज,जोगेश्वरी मातेची मिरवणूक ,कुस्त्यांचा जंगी आखाडा व लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आल्याने भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह व आनंद पाहायला मिळत आहे.दिनांक २२ एप्रिल रोजी हळदी समारंभ साजरा करण्यात आला.२३ एप्रिल रोजी लग्न समारंभ झाला. व २४ एप्रिलला देवाची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आले तर सोमवारी दिनांक २५ तारखेला श्री जोगेश्वरी देवीची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात येईल तसेच भैरवनाथ व श्री जोगेश्वरी ची घोड्यावरून मिरवणूक की दोन्ही दिवशी नामांकित वाद्यवृंद सहभागी होणार आहे . मंगळवारी २६ तारखेला श्रींच्या छबिन्याचा कार्यक्रम होणार असून भैरवनाथ देवाची पालखीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे .बुधवारी २७तारखेला दुपारी १२ वाजता महाप्रसाद भाविकांना देण्यात येईल तसेच दुपारी कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार असून त्यासाठी ५०० रुपयांपासून ते ५१ हजार रुपयांपर्यंत विजेत्या मल्लांना बक्षिसे देण्यात येतील. रात्री नऊ वाजता रेखा पाटील व मेघा कोल्हापूर कर यांचा लोकनाट्य तमाशा चा कार्यक्रम होईल. गुरुवारी तारीख २८ रात्री नऊ वाजता अप्सरा आली हा कार्यक्रम होणार आहे