हवेली प्रतिनिधी

हवेली (लोणी काळभोर) : महिला दिनाचे औचित्य साधून एक्टिव्ह क्लबच्या माध्यमातून लहान मुलांना शाळेतील वह्या, पेन्सिल या साहित्याचे वाटप करण्यात आले.
एक्टिव्ह क्लबच्या वतीने महिलाना ५० तुळशीचे रोपे वाटप करण्यात आली. एक्टिव्ह क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणार असल्याचे आणि महिलांना महिला दिनानिमित्त महिलांना स्वतःचे हक्काचे व्यासपीठ निर्माण कसे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले.
एक्टिव्ह क्लबची स्थापनाच महिला उन्नती साठी करण्यात आली आहे. महिलांना आपल्या सुख, दुःखाच्या विचारांची देवाण घेवाण करता आली पाहिजे. स्रीशक्तीचे पाठिशी खळबळ उभे राहण्यासाठी सक्षम मंच म्हणून कार्य करणार असल्याचे सांगितले. महिला एकत्र आल्या की एक ताकद निर्माण होते. एखाद्या गरजू महिलेला मदत करण्यासाठी एक्टिव्ह क्लब मदत करणार आहे.
यावेळी एक्टिव्ह क्लबच्या सविता वर्मा, नीलम खेडकर, देविका भंडारी, प्रीती तुपारे, जरीना इनामदार, राणी बडदे, वृषाली राजवाडे, रुपाली शिंदे, प्रज्ञा काळभोर उपस्थित होते.