सरपंच रमेश गडदे यांच्या मुलाची लग्न पत्रिका सामाजिक संदेश देत चर्चेचा विषय ठरली
कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथे सरपंच रमेश गडदे यांच्या मुलाच्या शुभविवाह प्रसंगी एक अनोखा उपक्रम राबवत आला. यावेळी पै – पाहुण्यांना शाल,श्रीफळ, फेटे, पुष्पगुच्छ यावरील अनावश्यक खर्च टाळून आलेल्या सर्व पाहुण्यांना विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात येऊन झाडे लावा झाडे जगवा असा पर्यावरण पूरक व प्रेरक संदेश देण्यात आला.या समाजोपयोगी उपक्रमा विषयी समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

सणसवाडी येथील कृष्ण लीला मंगल गार्डन कार्यालयामध्ये शिक्रापूरचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांचे चिरंजीव हार्दिक व धामरी गावचे सुनील हरिभाऊ सोनवणे यांची सुकन्या कल्याणी यांच्या शुभ विवाह प्रसंगी हा समाजोपयोगी व पर्यावरण पूरक व प्रेरक उपक्रम राबवण्यात आला.यावेळी अनेक मान्यवर पदाधिकारी, पै पाहुणे,आप्त स्वकीय व मित्र स्नेही उपस्थित होते.

लग्नाची पत्रिकेमध्ये मुलगी वाचवा दिला संदेश – सरपंच रमेश गडदे यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिकेमध्ये कोण पाहिजे ? यामध्ये जन्म द्यायला आई पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे , पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे , आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे,हट्ट पुरवायचा मावशी पाहिजे, जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे,पण हे सर्व करायला मुलगी पाहिजे असा संदेश देत मुलगी वाचवा असा संदेश देत सामाजिक बांधिलकी जपली.
पत्रिकेतील नावांची चर्चा – गावाकडील लग्न पत्रिका त्यावरील नावे हा कायम चर्चेचा विषय असतो त्यात शिक्रापूर सारख्या मोठ्या ग्राम पंचायतीचे विद्यमान सरपंच असल्याने वधू व वर पित्याच्या डोक्याला तान देणारा विषय असतो.ही लग्न पत्रिका आणखी एका कारणामुळे मोठ्या चर्चेत राहिली आहे. पुढारी, आजी माजी पदाधिकारी, नेते ,कार्यकर्ते यांच्या नावाने पत्रिका भरून जात असते पण या पत्रिकेत विविध आजी माजी पदाधिकारी व संघटना यांचा एकत्रित उल्लेख करत. वैकतिक नावे न टाकता सर्वांना समान स्थान देत. नामोल्लेख टाळून सुटसुटीत लग्न पत्रिका ही वाचनीय व चर्चेचा विषय ठरला.