
मिलिंदा पवार वडूज सातारा.
वडूज – दिनांक १६ मार्च
गोंदवले खुर्द येथील वनविभागाच्या माळराणावर नंदनवन करण्यासाठी या दोघा बहिण भावांनी खांद्यावरून पाणी आणून घातले.पावसाचे पाणी आडवून उन्हाळ्यात झाडांना पाणी मिळावे यासाठी त्यांनी , वनी करणात विहीर खोदून , पाण्यासाठी मार्ग शोधला , त्यांच्या या कार्याची दखल कृषीमंत्री यांनी घेतली व त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार भेटले आहेत.माणदेशी दुष्काळी आणल्यामुळे उन्हाचा तडाखा तीव्र असल्यामुळे रोहित् व रक्षिता यांनी वन्य प्राण्यासाठी व पक्ष्यांसाठी जागोजागी तळी निर्माण केली आहेत अनेक पक्षी त्त्यांच्या वनराई मध्ये आढळतात .पर्यावरण निसर्ग संवर्धन करणाऱ्या रक्षिता हिला आदिशक्ती महिला सन्मान पुरस्कार खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मिळाला आहे.अलीकडेच शिवजयंतीअलीकडेच शिवजयंतीनिमित्त खासदार उदयनराजे यांच्या बरोबर शिखर शिंगणापूर येथे रोहित व रक्षिता यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ही केला.तसेच रोहितला वयाच्या सोळाव्या वर्षीच उदयनराजें कडून छत्रपती धर्मवीर कर्मवीर संभाजीराजे भोसले हा गुणगौरव पुरस्कारही मिळाला आहे