
मिलींदा पवार सातारा
सातारा – मायणी (ता.खटाव) येथील सत्पुरुष सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज यांचा रथोत्सव सोहळा सोमवार दिनांक २८ मार्च रोजी संपन्न झाला जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे व माजी जिल्हा परिषद सदस्य शोभना गुदगे यांच्या शुभ हस्ते पूजन होऊन सकाळी नऊ वाजता रथ् सोहळ्यास प्रारंभ झाला. त्यानिमित्ताने सद्गुरू श्री यशवंत बाबा यांच्या कार्याचा आढावा घेतला.
मायनीचे यशवंत बाबा अशिक्षित होते. तरीही त्यांची संत परंपरेत तुलना केली जाते. संता सारखी त्यांची राहणी नव्हती बाल्यावस्थेपासून निसर्ग सहवास त्यांना प्रिय होता घरापासून दूर निसर्ग सानिध्यात तसेच ओढ्याकाठी पक्षी, प्राणी यांच्या कोलाहलात एकांतात राहणे हा त्यांचा छंद. समाजाला मानवतेचा धर्म शिकवण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता मुखी हरिनाम नाही ,भजन कीर्तनाची गोडी ,नाही डोक्यावर मुंडासे, अंगात पैरण ,खांद्यावर घोंगडी, हातात काठी धोतर व पायात जोडे असा भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या त्यांचा पोशाख होता अनेक साध्या विचारांच्या व आचरणाचा माध्यमातून लोकांना समाजाला मानवता धर्म शिकवला .
माजी आमदार स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे यांनी पुढाकार घेऊन यशवंत बाबा ट्रस्टची स्थापना केली होती त्या ट्रस्टच्या माध्यमातून रथाची उभारणी करून रथयात्रा सुरू केली.रथ् सोहळ्या दिवशी ,असंख्य भक्तगण देणग्या रथावर अर्पण करत असतात या जमा होणाऱ्या देणगीतून ट्रस्टच्या माध्यमातून भव्य सभामंडप व विवाह कार्यालय बांधण्यात आले आहे ट्रस्ट मार्फत पंढरपूर मध्ये जागा खरेदी करण्यात आली असून त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या मार्गदर्शनातून येथे भव्य असे भक्तनिवास बांधण्यात आले असून त्याचा यात्रा उत्सव काळात भक्तांना लाभ होत असतो त्याचप्रमाणे नुकतेच भव्य असे प्रवेशद्वार उभारण्यात आले असून तेथे गाळांयची ची निर्मिती करण्यात आली आहे दहा दिवस चालणारा यात्रोत्सवात खेळणी मेवामिठाई चे दुकाने पाळणे येत असतात त्याचप्रमाणे जनावरांची जंगी यात्रा ही भरत असते जनावरांची लाखो रुपयांची खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात मंदिरामध्ये वर्षभरात विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते दर एकादशीला व गुरुवारी भजन कीर्तन प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो यात्रा उत्सव निर्माण निमित्ताने मंदिरावर अत्यंत देखणे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.