Wednesday, November 29, 2023
Homeक्राइममुलाच्या निधनाने वडिलांची नैराश्यातून कोरेगाव भीमा येथील पुलावरून उडी मारत आत्महत्या

मुलाच्या निधनाने वडिलांची नैराश्यातून कोरेगाव भीमा येथील पुलावरून उडी मारत आत्महत्या

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथे लोणीकंद येथील बापुराव साळवे यांनी मुलाच्या निधनानं दुःखी होत नैराश्यातून कोरेगाव भिमा येथील पुलावरून उदी मारत आत्महत्या केली असून याबाबत त्यांची पत्नी सुमन साळवे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

सुमन साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे  बापुराव साळवे यांना पहिल्या पत्नी पासुन राहुल साळवे नावाचा मुलगा होता तो त्याचे मामाचे घरी राहत होता.  दि २५/१०/२०२३ रोजी मयत झाला होता.  बापुराव यांना दारूचे व्यसन होते त्यांचा मुलगा राहुल हा काल मयत झाल्यामुळे पती यांनी मला मी मुलगा मेल्यामुळे आत्महत्या करणार आहे असे म्हणुन घरातुन  सकाळी ०६/०० वा निघुन गेले होते.

मयत बापुराव बेलाजी साळवे (वय ५० वर्षे ) रा लोणीकंद ता.हवेली   यांनी कोरेगाव भिमा ता शिरूर जि पुणे येथील भिमा नदीच्या पुलावरून नदीत उडीमारून ते पाण्यात बुडुन मयत झाले आहेत असे सांगितले. तसेच त्यांना स्थानिक लोकांनी ३ वा ग्रामीण रुग्णालय शिक्रापुर येथे अरुग्णवाहिकेतून पाठविले असून सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मोरे करत  आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!