पुणे – दिनांक ४ ऑगस्टमाणुसकी अजून जिवंत असून प्राण्यांवर प्रेम करा, भूतदया दाखवत त्यांना जपण्याचा प्रयत्न करायला हवा हे आपल्या कृतीने पुण्यातील चार तरुणांनी दाखवून दिले.कार चालकाच्या बेफिर ड्रायव्हिंगमुळे भटक्या प्राण्याच्या पोटाला गंभीर जखम होऊन मोठा रक्तस्त्राव झाला पण तरुणांनी माणुसकी दाखवत त्याच्यावर उपचातासाठी दाखल करत तातडीने ऑपरेशन करत घरी राहण्याची केली व्यवस्था.
अपघातात जखमी झालेल्या मुक्या ( कुत्री) प्राण्याला जीवदान मिळावे म्हणून जवान महेश कुरकुटे, संदीप बिन्नर सर, अंकुश चंदेल यांनी केली धावाधाव केली असून पोटाला मोठी व गंभीर जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेल्या मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी तरुणाईचे कौतुकास्पद काम करत भूतदया व माणुसकी आणखी जिवंत असल्याचे अनोखे माणुसकी दर्शन तर घडवले आहे. पण प्राण्याला घरी नेऊन त्याच्या आरोग्याची व जीविताची काळजी घेणारी ही तरुणाई खरेतर एक आदर्शच म्हणावे लागेल.
एका कार चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात एका निष्पाप कुत्रीच्या अंगावरून गाडी गेल्याने तिचे पोट फुटले होते मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव चालू होता कारचालक भरधाव वेगात निघून गेला.प्रचंड वेदना होत असल्याने ती ओरडत ( विव्हळत) होती. यावेळी संध्याकाळी ऑफिसवरून घरी जाताना नेहरू उद्यान खडकी येथे भारतीय सैन्य दल खडकी येथे कार्यरत असलेले महेश भास्कर कुरकुटे, नाशिकचे संदीप बिन्नर सर, अंकुश चंदेल यांनी अपघातातील जखमी कुत्रीला बाजूला घेऊन प्राणी उपचार केंद्र शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर करत शिवाजी नगर येथील गावठाण भागातील प्राण्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क केला. जखमी कुत्रीच्या शरीरातून अती प्रमाणात रक्तस्राव सुरू होता कुत्रीला उपचारासाठी दवाखान्यात स्कूटीवररून नेत तिने मन टाकली होती. निष्पाप जीव एव्हढ्या मोठ्या अपघातातून वाचेल की नाही याची तरुणांच्या मनात साशंकता होती.
जखमी कुत्रीला दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन केले. पोट फुटून मोठी जखम झाली होती मोठ्या प्रमाणात टाके घालावे लागले होते. जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने दोन सलाईन भरण्यात आल्या. गोळ्या औषधे आणि स्प्रे घेऊन त्या प्राण्याला घरी घेऊन आले तसेच बिल्डिंग शेजारच्या जुन्या रूम मध्ये तिच्यासाठी जागा करून तिला व्यवस्थित ठेवण्यात आले असून कुटुंबीय तिची काळजी घेत असून तिला व्यवस्थित खाणे,गोळ्या व इतर सुश्रुषा करणाउत येत असल्याने पुण्यात माणुसकीचे अनोखे दर्शन झाले असून तरुणाईवर समाज माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तरुणाईचे हृदय स्पर्शी आवाहन – कृपाकरून मुक्या प्राण्यांवर प्रेम आणि दया करा. वाहने चालवताना आपल्यामुळे दुसऱ्याच्या जीवाचा खेळ होइल असे काही करू नका आणि चुकून अस काही झालंच तर गाडी घेऊन पुन्हा वेगात न पळता थांबून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा.जसा आपल्याला स्वतःचा जीव महत्त्वाचा आहे तसाच इतर लोकांना आणि मुक्या जनावरांना देखील महत्त्वाचा असून त्यांच्या पाठीमागे पण त्यांचं कोणीतरी आहे.आपल्याला काही झाल तर आपण बोलू शकतो. यातील कोणतीही गोष्ट मुकी जनावरे करू शकत नाही. अंगावर झेलण्याशिवय त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो म्हणून विनंती आहे की कृपाकरून मुक्या प्राण्यांवर प्रेम आणि दया करा. – महेश कुरकुटे, नाशिकचे संदीप बिन्नर सर, अंकुश चंदेल