
मिलिंदा पवार वडूज सातारा
सातारा – सातारा संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने चेतना सिन्हा यांना ग्रामीण दुष्काळी भागातील वंचित महिलांचा विकास आणि मायक्रोफायनान्स मधील मौलिक योगदानाबद्दल तेविसावा मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्राचार्य डॉक्टर अशोक भोईटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विचार मंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळ व उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कार्यवाह ,अड हौसराव धुमाळ विश्वस्त प्राचार्य डॉ. संजय कांबळे डॉ. सुवर्णा यादव उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली समतेच्या हक्कासाठी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह केला त्यास ९५ वर्षे पूर्ण झाली. या घटनेच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या या सोहळ्यात चेतना सिन्हा यांनी भावस्पर्शी भाषणात आपला क्रांतिकारी जीवनपट उलगडून दाखवला मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील तुरुंगवास आणि जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनाने आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली . उषा मेहता दलित पँथरचे नेते अरुण कांबळे यांच्या मार्गदर्शनामुळे सामाजिक चळवळीत योग्य दिशा मिळाली युवा संघर्ष वाहिनीचे काम करताना विजय सिंह यांची भेट झाली नामांतर आंदोलनात आम्ही दोघांनी तुरुंगवास भोगला चळवळीतील सहवासानंतर विजय जीवनसाथी झाले व मी त्याच्या ग्रामीण दुष्काळप्रवण माण तालुक्यातील म्हसवड मध्ये स्थायिक झाले व वंचित महिलांच्या चिरंजीव शाश्वत विकासाला वाहून घेतले तुरुंगात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा वाचली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या माता भिमाईने अखेरचा श्वास या साताराच्या भूमीत घेतला हा फार मोठा वारसा सातारा जिल्ह्याला लाभला आहे. हा प्रेरणादायी ठेवा पुढील पिढी समोर् कायम ठेवणे ही आपली जबाबदारी आहे .
मानदेशीच्या सामान्य वंचित महिला विविध , यशस्वीपणे , विविध क्षेत्रात नेतृत्व करू लागल्या आहेत. मातोश्री भिमाबाई आंबेडकर पुरस्काराच्या या महिलांच खऱ्या अर्थाने मानकरी असल्याचे त्यांनी सांगितले. माता भिमाबाई यांच्या नावाचा पुरस्कार माझ्या उर्वरित कार्याला प्रेरणा देणारा आहे असे मत आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सामाजिक कार्यकर्त्या मान देशी फाउंडेशन बँकेचे अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे डॉक्टर अशोक भोईटे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे वडील सुभेदार रामजी व्आई भिमाबाई यांच्या , ऐतिहासिक जीवनातील घटनांचे महत्त्व विशद् केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर संजय कांबळे , सूत्रसंचालन डॉक्टर सुवर्णा यादव यांनी तर रमेश इंजे यांनी आभार मानले कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच माणदेशी फाउंडेशन च्या महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते