वाघोली फुलमळारोड पावसाचे साठलेले पाणी पंपाच्या साह्याने उपसा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. – अनिल सातव पाटील
वाघोली : वाघोली (ता.शिरूर)
पावसाचे पाणी वाहण्यासाठी मार्गच नसल्याचे फुलमळा-भावडी रस्त्याला पुराचे स्वरूप आले आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये हीच परिस्थिती निर्माण होत असून या परिसरातील रहिवाशांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. तात्काळ रस्तावर साचलेले पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी या परिसरातील रहिवाशांकडून केले जात आहे.
वाघोलीतील फुलमळा-भावडी हा रस्ता पुणे-नगर महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर शाळा, सोसायट्या, नागरी वस्त्या, विद्युत महावितरणचे कार्यालय, कंपनी व छोटेमोठे व्यवसायिक आहेत. त्यामुळे या रस्त्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळी नाल्या व ड्रेनेज अभावी विशेषतः पावसाळ्यामध्ये या रस्त्याला पुराचे स्वरूप प्राप्त होते. सध्यस्थितीत सुद्धा ड्रेनेज अभावी व्हीनस पार्क सोसायटी समोर मोठ्याप्रमाणावर पाणी साचत असल्याने येथील रहिवाशांसह विद्यार्थ्यांना धोका पत्करत ये-जा करावी लागत आहे. रस्त्याला पुराचे स्वरूप आल्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तात्काळ पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाता आहे.
रविवारी (२५ जून) वाघोलीत साधारण पावसाच्या सरी बरसल्या तर या रस्त्याला एवढे मोठे पुराचे स्वरूप आले. मोठ्याप्रमाणावर पाऊस झाल्यास नागरिकांना अतिशय बिकट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.
दरवर्षी भावडी-फुलमाळा रस्त्याला पावसाच्या पाण्यामुळे पुराचे स्वरूप येते. याही वर्षी तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी अनेकवेळा लेखी निवेदनाद्वारे संबधित विभागाकडे मागणी केले आहे. परंतु अद्यापही पाणी जाण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. – ॲड. गणेश म्हस्के (विधी विभाग म.रा. उपाध्यक्ष, मनसे

वाघोली फुलमळारोड पावसाचे साठलेले पाणी पंपाच्या साह्याने उपसा करण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याची माहिती भाजपाच्या अनिल सातव पाटील यांनी दिली.