स्मित सेवा फाऊंडेशनक्या माध्यमातून तब्बल ३५०० महिलांपर्यंत कॅलेंडर वाटप व हळदी – कुंकू, वाणाचे वाटप.

प्रतिनिधी सुनील थोरात हवेली
हडपसर – हडपसर ( ता.हवेली) दिनांक ११ फेब्रुवारी
भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर प्रभाग २५ मधील हडपसर गाव, हिंगणे मळा, ससाने नगर गाडीतळ, सातववाडी अशा विविध ठिकाणी हळदी कुंकू चे कार्यक्रम घेण्यात आले होते साधारणतः ३५०० महिलांपर्यंत हळदी कुंकू वाण व कॅलेंडर्स वाटप भाजपा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष व स्मितसेवा फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्मिता तुषार गायकवाड यांच्या मार्फत करण्यात आले.
यावेळी नगरसेविका उज्वला जंगले, हडपसर विधानसभा महिला आघाडी अध्यक्ष स्वाती कुरणे, हडपसर विधानसभा ओबीसी मोर्चा अध्यक्ष सीमा शेंडे, छाया गदादे, शिल्पा होले, संगीता पाटील, नूतन पासलकर, मोहिनी शिंदे, निकिता निंगाले, सुशीला ताईचौरे, अश्विनी शेंडे, आरती यादव, सुनिता पाटिल, सुनीता हिंगणे, सुजाता हिंगणे, अर्चना काटे, अलका भुजबळ, वैशाली पाटील, अंजली सोहा, सुनंदा देशमुख, विजया भुमकर, मोनाली हिंगणे, भारती भुजबळ, शर्मिला डांगमाळी, लक्ष्मी घुले, सारिका देशमुख, मनीषा यादव, सुवर्णा ताम्हाणे, रूपाली पाटील, संगीता बोराटे, प्रमिला लोखंडे, वैजयंती जाधव, त्रिशाला वर्मा, ललिता चिल्लाळ, अनिता सातव, झेंडे ताई, स्वाती हिंगे, अनिता देशमाने, तोडकर ताई, नेहा वाले, अपर्णा ससाणे, काशिनाथ भुजबळ, पुष्पा नेवसे तसेच भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते व स्मितसेवा फाउंडेशन सदस्य उपस्थित होते.

.
महिलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलवण्यासाठी व कोरोणा प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या विशेषतः महिला भगिनींचा मनावर जे भीतीयुक्त दडपण आले आहे ते घालवण्यासाठी व ज्या कुटुंबावर दुःखाचे दिवस आले त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. –स्मिता गायकवाड,भाजपा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष व अध्यक्षा स्मितसेवा फाऊंडेशन
