मिलिंदा पवार सातारा
सातारा – वडुज ( सातारा ) राष्ट्रीय पोषण माहे २०२२ व मिशन धाराऊ , प्रचार व प्रसिद्धीएकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प खटाव वडूज यांच्या वतीने बालविकास प्रकल्प अधिकारी किरण उदमले व पर्यवेक्षिका संगीता काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज येथे राष्ट्रीय पोषण महिना अंतर्गत स्वस्थ बालक स्पर्धा व किशोरी मुलींच्या रांगोळी स्पर्धा हा कार्यक्रम घेण्यात आला.
पोषण महा कार्यक्रमांतर्गत प्रत्येक अंगणवाडीतील आदर्श बालकातील सहा महिने ते तीन वर्ष व ५ ते६ वर्ष वयोगटातील बालकांना स्वच्छता कीट व स्वस्थ बालक प्रशस्तीपत्र तसेच गरोदर मातांना पोषणकिट व मिशन धाराऊ व पुस्तिका देण्यात आल्या .

नगरपंचायतच्या सहाय्यक अध्यक्ष राजू काटकर यांनी अंगणवाडी बालकांना पोषणकिट तसेच किशोरवयीन मुलींना नगरसेविका आरती काळे यांनी बक्षीस वाटप केले. यावेळी राष्ट्रीय पोषण व मिशन धाराऊ अभियानाचा प्रचार व प्रसिद्धीसाठी हुतात्मा स्मारक मध्ये वेगवेगळ्या कार्यक्रम राबवण्यात आले .
कार्यक्रमाबाबत महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांनी सदिच्छा भेट देऊन मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मनीषा काळे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, नगरसेविका राधिका गोडसे, रेश्मा बनसोडे, आरती काळे ,स्वप्नाली गोडसे, नगरसेवक सोमनाथ पाटोळे, नगरसेवक वायदंडे सर, प्रतीक बडेकर, नगरपंचायत सहाय्यक अधीक्षक राजू काटकर, कुंभार मॅडम ,उर्मिला साळुंखे , अंगणवाडी सेविका मदतनीस स्वस्थ बालक स्पर्धेचे लाभार्थी गरोदर माता किशोर मुली तसेच प्राथमिक शाळेचे शिक्षक, शिक्षिका ,मुख्याध्यापिका उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविकास सोनम जगताप यांनी केलेले पर्यवेक्षिका काकडे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.
