टीकात्मक राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण महत्वाचे – पि.डी.सी.सी बँकेचे संचालक प्रदीप कंद
पूर्व हवेलीत १० कोटी,५० लाख विकासकामांचा शुभारंभ
कोरेगाव भीमा – पेरणे ( ता.हवेली)पुर्व हवेलीच्या सर्वांगिण विकासासाठी आजवर भरीव निधी दिला असून यापुढील विकास करण्यासाठी सदैव कटीबद्ध असल्याची ग्वाही शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच जिल्हा बँकेचे संचालक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिपदादा कंद यांनी दिली. पुर्वहवेलीच्या सर्वांगिण विकासासाठी आजवर भरीव निधी दिला असून यापुढील विकासाकरीताही सदैव कटीबद्ध असल्याची ग्वाही शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच जिल्हा बँकेचे संचालक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांनी दिली.
पुर्व हवेलीत आढळराव पाटील तसेच प्रदिपदादा कंद व भाजपा राज्य क्रिडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदिपआप्पा भोंडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना – भाजपासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पेरणे, डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी सांडस, न्हावी सांडस, अष्टापूर तसेच गावडेवाडी, वाडेगावात जनसंवाद दौरा केला. या दरम्यान या परिसरातील सुमारे १० कोटी ५० लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांची उद्धाटने, भुमीपुजन कार्यक्रम तसेच न्हावी सांडस येथे पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभही करण्यात आला.

पेरणे (ता. हवेली) येथे जनसंवाद दौऱ्याच्या शुभारंभप्रसंगी लोणीकंद ते पेरणे डोंगरगाव रस्ता तसेच येवले वस्ती ते बकोरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ यावेळी आढळराव तसेच कंद यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद, भाजपा हवेली तालुकाध्यक्ष शामराव गावडे, माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, शिवसेना हवेली तालुकाप्रमुख विपुल शितोळे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संदिप सातव, अलंकार कांचन, गणेश सातव, जिल्हा सचिव प्रदिप सातव, महिला मोर्चा अध्यक्षा पुनम चौधरी, सुप्रिया गोते, पंचायत राजचे जिल्हा उपाध्यक्ष शरद आव्हाळे, संपर्क प्रमुख प्रशांत कोतवाल, तालुका सरचिटणीस गणेश चोधरी, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस साईनाथ वाळके पाटील, माधुरी वाळके, सरपंच उषा वाळके, उपसरपंच गणेश येवले आदी उपस्थित होते.
यावेळी आढळराव यांनी कंद यांच्या शिरुर – हवेलीतील कार्याचे कौतुक करुन कंद यांनी या मतदार संघाचे सक्षमपणे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर छत्रपती शंभुराजांच्या ऐतिहासिक स्मारकासाठी श्रीक्षेत्र वढु – तुळापूरसाठी ४०० कोटींचा विकास आराखडा मंजुरी, हिंगणगाव खामगाव टेक पुलासाठी २५ कोटीं तर तुळापूर-भावडी रस्त्यासाठी १० कोटीचा निधी, यासह विविध विकासकामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठबळामुळे मार्गी लावता आल्याचे समाधान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
टिकात्मक राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण महत्वाचे – यावेळी संचलक प्रदीप कंद यांनी टिकात्मक राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण महत्वाचे असल्याचे सांगत आढळराव दादा यांच्या पाठपुराव्याची हवेलीतील रस्ते तसेच विकासकामांना मोठी मदत झाल्याचे नमुद केले. तर पेरणे परिसराला आजवर १५ कोटींचा निधी दिला असून पंतप्रधान मोदीजीच्या संकल्पनेतील २७ कोटींच्या नव्या जलजीवन मिशन योजनेमुळे पाण्याचाही प्नश्न कायमचा सुटणार आहे. पेरणे गावचे उर्वरित प्रश्न सोडवण्याची तसेच पेरणेत शिवाजी पुतळा चौक सुशोभिकरणाच्या उर्वरित कामाचीही ग्वाही कंद यांनी दिली.
याप्रसंगी माजी उपसरपंच शरद माने तसेच दशरथ वाळके यांनी स्वागत करुन पेरणे गावच्या समस्या व मागण्या मांडल्या. माजी उपसरपंच शिवाजीनाना वाळके यांनी सुत्रसंचालन केले.