Thursday, September 28, 2023
Homeताज्या बातम्याक्रीडापुणे येथील क्रिकेट लीग स्पर्धेसाठी शायान अन्सारी याची निवड

पुणे येथील क्रिकेट लीग स्पर्धेसाठी शायान अन्सारी याची निवड

लोणी – पुणे येथे होणाऱ्या क्रिकेट लीग स्पर्धेसाठी १४ वर्षे वयोगटातील अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघातील शायान अन्सारी यांची गोलंदाजी व फलंदाजीच्या उत्कृष्ठ प्रदर्शनामुळे महाराष्ट्र असोसिएशनने घेतलेल्या क्रिकेट आंतरजिल्हा क्रिकेट लिग स्पर्धेत निवड झाली असून लोणीतील क्रिकेट लीग स्पर्धेसाठी निवड झालेला पहिला खेळाडू ठरला असल्याची प्रवरा क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक अतुल ठाकूर यांनी ही माहिती दिली.

शायानला अफजल पटेल , कादीर शेख , सितारा वरखड , अब्दुल हमीद अन्सारी यांचे मार्गदर्शन लाभले . त्याच्या या यशाबद्दल राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील , खासदार डॉ . सुजय विखे पाटील यांनी अभिनंदन केले असून भावी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!