बांधकाम विभागाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ आता तरी थांबेल का ??
पिंपळे जगताप ( ता . शिरुर ) येथील शिक्रापूर – चाकण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेकदा अपघात होत आहे . यामुळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती करूनही दखल न घेतल्याने उपसरपंच शुभांगी शेळके यांनी सामाजिक भावनेतून रस्त्यावरील खड्डे स्व : खर्चाने बुजविले आहे .
पिंपळे जगताप येथील चाकण रस्ता हा औद्योगिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून येथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. चौफुला येथे रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले असल्याने अनेकदा लहान मोठे अपघाताच्या घटना घडत होत्या . वाहनचालक व प्रवाशांना याचा त्रास होत होता. याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करीत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी केली . परंतु बांधकाम कोणतीही दखल विभागाकडून घेतली नाही . तसेच रस्त्यावरील खड्डे राहिल्याने अपघातांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने उपसरपंच शुभांगी शेळके व उद्योजक स्वप्नील शेळके यांनी पुढाकार घेतला . त्यांनी स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजविले आहे .
चाकण - शिक्रापूर मार्गावर खड्डे पडल्याने वाहनचालक व प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे मात्र गेड्यांच्या निगरगट्ट कातडीचा बांधकाम विभाग आता तरी खड्डे बुजविण्यासाठी काम करेल की नागरिकांच्या जीवाशी होत असलेला खेळ पाहत राहणार आहे.याबाबत वरिष्ठ दखल घेऊन तातडीने कार्यवाही करतील काय ?असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
यावेळी उद्योजक स्वप्नील शेळके , मनोज आस्वार , विशाल बेंडभर , अक्षय शेळके , रवी शेळके , मयूर शेळके , अमित शेळके , प्रज्ज्वल बेंडभर उपस्थित होते .
चाकण – शिक्रापूर महामार्गावर खड्डे पडल्याने लहान मोठे अपघात होत होते. नागरिकांना दुखापत तसेच वाहनांचे नुकसान होत असल्याने सामाजिक बांधिलकी जपतभावनेतून हे खड्डे बुजविले आहेत. – उपसरपंच शुभांगी शेळके