
कोरेगाव भीमा – नाव्ही सांडस ( ता.हवेली) येथे भिल्ल वस्ती, सिद्धार्थनगर व गावातील अनेक ठिकाणी विजेच्या खांबाचे प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेले होते, विजेचे खांब हे घरापासून वस्तीपासून दूर असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती, यामुळे अपघाताची शक्यता असल्याने नागरिकांनी ही माहिती महाराष्ट्र वीज विद्युत वितरण समितीचे सदस्य विपुल शितोळे यांना देऊन त्वरित पोल उपलब्ध करण्याची विनंती केली, यावर विपुल शितोळे यांनी विज महावितरणचे अधिकारी यांचा वारंवार पाठपुरावा करून 30 पोल मंजूर करून घेत सदर काम तातडीने सुरू झाले,वस्तीवरील महिलांच्या हस्तेच या कामाची सुरुवात करण्यात आल्याने महिला भगिनींनी समाधान व्यक्त केले.सरपंच नामदेव शितोळे यांनी कॉन्टॅक्टर यांचा सन्मान करून अधिकाऱ्यांचे व विपुल शितोळे यांचे आभार मानले .
या वेळी सरपंच नामदेव शितोळे, शहाजी शितोळे, चंद्रकांत जगताप, काळूराम खाडे, सुरेश शितोळे, प्रमोद शितोळे , बाळासाहेब जगताप यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्युत वीज नियंत्रण समिती सदस्य पदी माझी निवड ही फक्त सत्कार स्वीकारण्यापूरती नाही झाली तर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी झाली आहे . नागरिकांनी देखील आपल्या घरातील विजेचा प्रश्न असेल किंवा शेतीवरील विजपंपाचा प्रश्न असेल माझ्याशी कधीही संपर्क करावा तो सोडविण्यासाठी मी कटिबध्द असेल .- विपुल हनुमंत शितोळे ,सदस्य विद्युत वीज नियंत्रण समिती