Thursday, September 21, 2023
Homeस्थानिक वार्तानगर विकास व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लहान...

नगर विकास व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लहान मुलांना खाऊचे वाटप करून साजरा

प्रतिनिधी कुलदीप मोहिते कराड

उंब्रज ( ता कराड) – दिनांक ९ फेब्रुवारी

महाराष्ट्र राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त व इंद्रसेन समीर भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवडे (उंब्रज ) येथील जिल्हा परिषदेतील शाळेतील मुलांना खाऊचा वाटप करून अगदी साध्या व अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला प्रथम उंब्रज येथील बाजार पेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला नंतर शिवडे( उंब्रज) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. वाढदिवस राज्य शासनाने घालून दिलेल्या सर्व कोरोनाच्या नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला . यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय भोसले शिवडे गावचे उपसरपंच अमोल कुंभार, ग्रामपंचायत सदस्य शोभाताई कदम ,शाखाप्रमुख महादेव भोंगाळे ,लक्ष्मण नाईक, शिक्षिका ज्योती पानसरे ,साळुंके मॅडम व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते

वाढदिवसानिमित्त लहान मुलांना खाऊचे वाटप करताना
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!