ॲड किशोर ढोकळे यांनी कामगारांचे आयुष्य उभारले असून शिवाजी महाराजांच्या विचारांचे खरे पाईक असल्याचे गौरवोद्गार ॲड असीम सरोदे यांनी व्यक्त केले.
कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथील कामगार मेळाव्यात देशात जातीय,धार्मिक द्वेषाचे वातावरण बदलायला हवे.हिंसा ही मानवतेसाठी घातक आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला सुखी करणारे सरकार हवे, कामगारांच्या हितासाठी जागृत असणारे सरकार ,प्रशासन व न्यायव्यवस्था हवी तसेच प्रत्येकाच्या आतील सत्याचा आवाज हा भयमुक्त असायला हवा ही लोकशाही असून यामध्ये व्यक्तिस्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अनन्यसाधारण महत्त्व आसहे. एका व्यक्तीसाठी व्यवस्था नाही तर सर्वांसाठी आहे.
यावेळी राष्ट्रीय श्रमिक एकता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड किशोर ढोकळे यांनी कामगारांचे आयुष्य उभारत शिवाजी महाराजांच्या विचारांचे खरे पाईक आहेत असे उद्गार ॲड असीम सरोदे यांनी व्यक्त केले.
उद्योगनगरी सणसवाडी ( ता.शिरूर) येथील कृष्णलीला मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रीय श्रमिक एकता संघाच्या कामगार मेळाव्याच्या व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ विधीज्ञ व सामाजिक कार्यकर्ते ॲड असीम सरोदे व इतर मान्यवरांनी अनमोल मार्गदर्शन केले.
यापुढे ॲड असीम सरोदे यांनी गांधीजींच्या विचारांबद्दल राज्यभर स्पर्धा घेतली त्यात गांधी विचारांबाबत अरुण गवळी राज्यात पहिला नंबर यांना मिळाला.ज्याने हिंसा केली त्याला अहिंसेचे महत्व कळते का ? तर नाही विचारांची परिपक्वता असल्यावर अहिंसा कळते कल्याणकारी दृष्टिकोन व न्यायावादि दृष्टिकोन असायला हवा.अभिव्यक्त स्वांतत्र्याचे महत्व सांगताना लाचार पत्रकारिता असेल तर निर्जीव नागरिकता जन्माला येईल . प्रसारमाध्यमे दूषित झाले आहेत टी व्ही चॅनल बंद करा. पेपर वाचा.जगातील वेगवेगळे सिनेमा पाहा.स्वतः ला घृनेतून बाहेर काढायचे असेल तर चॅनलच्या बातम्या पाहणे बंद करा खूप वाटले तर दुसऱ्या दिवशीचा पेपर वाचा,पण प्रसिद्धी माध्यमांच्या माऱ्यापासून लांब रहा असा सल्ला यावेळी ॲड असीम सरोदे यांनी दिला.
कामगार न्यायालयात कामगारांचे आयुष्य त्यांचा जीवनमानाचा दर्जा माहीत नसतो त्यांच्या अडीअडचणी व समस्या माहित नसतात त्यामुळे न्यायदान करताना अडचणी येतात कायदा बदलता येईल पण त्यांचा दृष्टी व दृष्टिकोन बदलायला हवे यामध्ये संतुलन करता यायला हवे.
राजकीय पक्ष केवळ आपले राजकीय प्रतिनिधी आहेत.राज्यपाल भगत मलिक कोषारी हे विचित्र राज्यपाल होते. यावर उपस्थित कामगार बंधूंनी शिट्ट्या व टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. माजी राज्यपाल सत्यपाल सिंह यांचा पुलवामा घटनेचा उल्लेख करत राजकारणासाठी जे चाळीस सैनिक यांच्या जीवनाचा हिशोब कोण देणार असा सवाल यावेळी ॲड सरोदे यांनी उपस्थित केला.
सध्या न्यायालयासमोर पक्षांतर बंदी कायद्याची कसोटी लागली आहे. येणारा निर्णय हा ऐतिहासिक असेल. शिवाजी महाराजांचे नाव घ्यायची लायकी नसेल त्यांच्याबाबतीत आपल्याला निर्णय घ्यावा लागेल
भ्रष्टाचारी व बलात्कारी यांना मांडीवर घेऊन बसनाऱ्यांना काय म्हणावे ?श्रमिक संघ श्रमांचा आदर व सन्मान करणारी माणुसकी प्रधान संघटना आहे. जातीय वादाची , भांडणे , पुतळ्यांचे राजकारण यांची गरज राजकारण्यांना आहे सामान्य माणसाला नाही.सरकारने भ्रष्टाचारी माणसांना मांडीवर घेण्याचे काम केले त्या सरकारला बदलायला हवे..फालतू माणसाच्या वाढदिवसाचे ट्विट करणारे महत्त्वाच्या विषयावर बोलत नाही द्वेषाचे राजकारण थांबायला हवे बदल्याची भावना संपायला हवी विकासाच्या बाबतीत विचार हवा.सध्या कोण नको आहे हे ठरवण्याची वेळ आली आहे.आता आपल्याला सुधारणा करावी लागेल भाकरी बदलणे गरजेचे. द्वेष निर्माण करणारा समूह निर्माण झाला असून जाती धर्माला नाही तर माणूस म्हणून महत्व आहे. काँग्रेस मुक्त भारत झाला पाहिजे ही भूमिका लोकशाहीला घातक आहे.घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अवमान आहे.ग्रामगीता समजून घेऊ शेतकऱ्यांचे जीवन किती महत्वाचे आहे बुद्धीप्रामाण्यवाद महत्वाचा आहे असे मत व्यक्त विविध ज्वलंत प्रश्नांना स्पर्श करत आपले विचार ज्येष्ठ विधी तज्ञ ॲड असीम सरोदे यांनी व्यक्त केले.

यावेळी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांनी कामगारांचे आयुष्य हे अत्यंत संघर्षाचं व बिकट आहे त्यांच्यासाठी सर्वांनी काम करायला हवे असे मत व्यक्त केले.
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी राष्ट्रीय श्रमिक एकता संघ हा कामगार संघ अत्यंत प्रामाणिक पणे काम करत आहे.आपल्या हितासाठी कोण काम करत आहे ते लक्षात घेऊन सोबत राहायला हवे. औद्योगिक क्षेत्र टिकले तर रोजगार टिकणार आहे. आपण कामगार असलो तरी आपली पुढची पिढी व्यावसायिक शिक्षण देत उद्योजक म्हणून घडवा असे विचार व्यक्त करताच उपस्थितांनी टाळ्या व शिट्ट्यांचा भरघोस प्रतिसाद दिला.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र दरेकर यांनी ॲड ढोकले साहेबांच्या कार्याविषयी गौरोवोदगार काढले. राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र दरेकर यांनी अभ्यासू मनोगत व्यक्त करत कामगारांना प्रेरित केले यावेळी वातावरण भारावले गेले टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.कामगार चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती भापकर यांनीही कामगारांच्या अडीअडचणी व दुःख व्यक्त करत उपस्थितांच्या मनातील शल्य व्यक्त केले.
राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष ॲड किशोर ढोकले यांनी देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार औद्योगिक क्षेत्रात घडत असून औद्योगिक क्षेत्र भ्रष्टाचाराने वेढले असून कुरण झाले आहेकंत्राटी कामगारांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. कामगारांचे लाखो रुपये खाणाऱ्या कंपन्यांवर कोणतीही कार्यवाही होत. चाळीस टक्के कामगारांची नोंद होत नाही.
मागील दहा वर्षांपासून कामगारांच्या पगार वाढ दर ,( टक्के) दर कमी होत आहे. याचा कामगारांच्या जीवनावर व राहणीमानात गंभीर परिणाम करतात.महिलांना कामावरून. कमी करण्यासाठी व त्रास देण्यासाठी रात्रपाळी देण्यात येते व त्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यात येत नाही. पाळनाघर नाही असे विचार व्यक्त करत कामगारांची दयनीय अवस्था मांडली
कामगार दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
निर्भिड पत्रकारितेसाठी कै. भाई वैद्य स्मृती पुरस्कार – ज्येष्ठ पत्रकार भरत पंचंगे , कामगार मित्र पुरस्कार – पुण्याचे सहाय्यक कामगार आयुक्त, दत्तात्रय दादासाहेब पवार , कामगार मित्र पुरस्कार -शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक,प्रमोद क्षिरसागर , उत्कृष्ट औद्योगीक संबंध संयुक्त पुरस्कार – वायका इन्स्टुमेंटस प्रा. लि. (व्यवस्थापन) वायका कामगार संघटना (संघटना कार्यकारिणी)के. राव बहादुर नारायण मेघाजी लोखंडे भूषण पुरस्कार – गणेश जयवंत जाधव, खजिनदार, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ जनरल सेक्रेटरी, यझाकी इंडिया एम्प्लॉईज युनियन. समाज मित्र पुरस्कार -जेष्ठ विधी तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते ॲड असिम सरोदे यांना देण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, पुस्तक, शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प असे होते.
यावेळी सणसवाडी ग्रामनगरीच्या सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, माजी सरपंच स्नेहल राजेश भुजबळ, राष्ट्रीय अध्यक्ष ॲड किशोर ढोकळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष दत्तात्रय येळवांडे , सणसवाडीचे माजी सरपंच रमेश सातपुते, जनरल सेक्रेटरी अविनाश वाडेकर, खजिनदार गणेश जाधव, सह सेक्रेटरी राजाराम शिंदे यांच्यासह विविध कामगार संघटना,पदाधिकारी, मान्यवर कामगार नेते, कार्यकर्ते व समाज सेवक व नागरिक यांच्यासह महिला कामगार भगिनिही मोठ्या संख्येने उपस्थित होते.