
राष्ट्रीय पक्षी मोर, शेती व पिण्यासाठी पाणी मिळण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक
प्रतीनिधी पोपट उकिर्डे
चिंचोली मोराची – दिनांक १९ जून चिंचोली मोराची ( ता.शिरूर) येथील ग्रामस्थांनी पाण्याची मागणी केली असून राष्ट्रीय पक्षी मोराला पोटच्या मुलासारखे जपत असून, गावच्या दोन्ही बाजूने कॅनॉल गेले असून त्यातून गावाला पाणी मिळत नाही , मोराचे हल हित आहेत मागील अनेक वर्षांची मागणी सरकारने मान्य करावी व मोरांना पाणी उपलब्ध करून द्यावे अशी चिंचोली मोराची व नवज्योत फाऊंडेशन यांच्या माध्यमातून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांच्या मागण्या पुढीलप्रमाणे –
१) मुख्य मागणी चासकमान किंवा डिंभा चारीचे पाणी आमच्या गावाला द्यावे.
२) चिंचोली मोराची पर्यटन स्थळ मध्ये मोरांची काळजी, देखभाल करण्यासाठी समिती स्थापन करावी.
३) मोराना जगवण्यसाठी ग्रामपंचायतला निधी उपलब्ध करुन द्यावा.
शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने २० जुन रोजी सकाळी ९ वाजता चिंचोली येथून खंडोबा चे जागरण गोंधळ करून शिरुर तहसिल कार्यालयावर पाणी जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची हे गाव शासना ने क दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.कित्येक वर्षापासून चिंचोली गावात शेतीसाठी पाणी, पिण्यास पाणी या समस्या आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहवे लागते.चिंचोलीच्या जवळच्या परिसरात अवघ्या काही अंतरावर दोन्ही बाजुला कालव्याचे पाणी जाऊन सुध्दा चिंचोली गावला त्याचा फायदा होत नाही. चिंचोली गावाला पावसाळा सोडला तर शेतीला तर नाहीच नाही निदान पिण्यासही पाणी नसते. गावात पहिल्या पासुन मोर आहे.घरातल्या मुलांना जपावे तसे गावकरी मोराची काळजी घेतात.पण अन्न, पाणी नसल्यामुळे काही मोर स्थलांतरित झाले आहे.पुढील काळात अशीच परिस्थिती राहिल्यावर मोरासोबत आम्हालाही पाणी विना स्थलांतरित व्हावे लागेल अशी चिंता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
चिंचोलीच्या ग्रामस्थांनी शासनाला विनंती करत गावाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर चासकमान किंवा डिंभा चारीचे पाणी आमच्या गावाला द्यावे.पाणी ची समस्या ही गंभीर आहे.या समस्यांचे निवारण न झाल्यास पुढील काळात आम्ही आंदोलन व उपोषण करुन .आमच्या शासना कडे मागण्या मंजुर करण्यासाठी प्रयत्नशील राहू.