Saturday, September 30, 2023
Homeस्थानिक वार्ताचिंचोली मोराची ग्रामपंचायत उपसरपंच पदी अश्विनी मोहिते यांची बिनविरोध निवड

चिंचोली मोराची ग्रामपंचायत उपसरपंच पदी अश्विनी मोहिते यांची बिनविरोध निवड

चिंचोली मोराची – चिंचोली मोराची ( ता.शिरूर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अश्विनी विजय मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपसरपंच राहुल नाणेकर यांनी विहित कालावधी मध्ये उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर सदरचे पद रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी सरपंच अशोकराव गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली.

यावेळी सरपंच अशोक गोरडे ,ग्रामसेवक भाऊसाहेब गिरी, माजी उपसरपंच राहुल नाणेकर ,सदस्य विमल नाणेकर,चैत्राली गोरडे,तंटामुक्ती अध्यक्ष वामनराव नाणेकर यांनी अश्विनी विजय मोहिते यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी मोहन नाणेकर, सुरेश नाणेकर ,चंद्रकांत नाणेकर , गणेश धुमाळ,पांडुरंग चतुर,मेजर संतोष नाणेकर,दादा धुमाळ, भाऊसाहेब मोहिते, दत्तात्रय करंजकर ,महादेव फंड, दादाभाऊ नाणेकर, उद्धव करंजकर ,वैजनाथ मोहिते, संतोष मोहिते,बाळासाहेब गोरडे ,नामदेव नाणेकर,जनाबाई मोहिते,सुप्रिया मोहिते ,नैना मोहिते, कांताबाई मोहिते,ग्रामपंचायत कर्मचारी सुखदेव धुमाळ,अदि मान्यवर व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,सर्व वि.वि. सोसायटी सदस्य, आजी-माजी पदाधिकारी,माजी सैनिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!