कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथे भर लोकवस्तीत तळ ठोकून असलेल्या बिबट्याला एका कंपनीतील खोलीमध्ये शिरलेला असताना कोंडण्यात यश आल्याने अखेर वनविभागाच्या मदतीने जेरबंद करण्यात यश मिळाल्याने कोरेगाव भीमा करांनी सुटकेचा निःश्वास टाकला. (Because of the bravery of the villagers… the leopards of Koregaon Bhima are jailed)

कोरेगाव भीमा येथील आनंद पार्क, जवळील शेत , गोठ्या जवळ काल दुपारपासून तळ ठोकून असलेल्या बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने बिबट्याने कोणावरही हल्ला केला नाही. संसार कंपनी जवळ सदर बिबट्या आला तेथे एका पीकअप गाडीच्या मागे बसला त्याच्या हालचालींवरून तो आजारी असल्याचे सांगितले जात आहे.

तेथे कोरेगाव भिमा येथील ग्रामस्थ जमा झाले होते यावेळी बिबट्या एका खोलीत शिरला त्यवली शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे नेते अनिल काशीद यांनी मोठे धाडस खोलीची कडी लावली व गावातील संतोष साळुंखे,ॲड प्रताप साळुंखे ,किरण साळुंखे व सिद्धार्थ काशीद यांनी मोठ्या धाडसाने बिबट्याला खोली बंद करण्यासाठी मोलाची मदत केली. बिबट्याला जेरबंद केल्यावर कोरेगाव भिमा ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला.
यावेळी सरपंच विक्रम गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, माजी पंचायत समिती सदस्य पि.के .गव्हाणे, माजी सरपंच अशोक काशीद , सामाजिक कार्यकर्ते संपत गव्हाणे, सुरेश शेवाळे , पोलीस मित्र खंडू चकोर, नितीन पोपट गव्हाणे,चेतन गव्हाणे, ग्राम सेवक रतन दवणे,पोलीस पाटील मालन गव्हाणे, वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.