
प्रतिनिधी सुनील थोरात हवेली
कदमवाकवस्ती- कदमवाकवस्ती( ता.हवेली)येथील गोल्डन सियारा पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक शिवजयंती जन्मोत्सव अतिशय उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे शिवव्याख्याते दुर्ग अभ्यासक, श्अनिकेत वाघ, इतिहास अभ्यासक श्री.चेतन साळूंखे, शिवशाहीर महेश खुळपे , विशाल वेदपाठक ,सचीन दाभाडे स्कूल कमिटी चेअरमन शैलेश चंद ,उपाध्यक्ष रमेश चंद, खजिनदार अर्जुन चंद , मुख्याध्यापिका प्रीती खणगे आदी मान्यवर उपस्थित होते. शिवजयंती प्रति विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सध्याच्या काळात शिव विचार प्रत्येकाच्याच मनात रुढ व्हावेत व शिवकालीन युद्ध कला याबाबत मार्गदर्शन केले. स्कूलमधून व्याख्याते, शाहीर तयार हावे. अशा शुभेच्छा सर्वच मान्यवरांनी दिल्या. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण विद्यार्थ्यांनी केलेल्या शिवकालीन शस्त्र प्रात्यक्षिकाने पालकवर्ग भारावला गेला विद्यार्थ्यांनी केलेल्या भाषणांचा सर्वच पाहुण्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका चांदणे यांनी केले. सर्व शिक्षक सेवक वृंद विद्यार्थी पालकांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग दर्शविला. यावेळी गोल्डन सियाराचे संस्थापक अध्यक्ष शैलेश चंद, मुख्याध्यापक प्रिती खणगे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते.