
प्रतिनिधी मिलिंदा पवार सातारा
वडूज – दिनांक १६ मार्च
खटाव माण या दुष्काळी भागाचा रखडलेला शेतीपाणी व अन्य प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी पक्षीय भेद विसरून सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस रणजितसिंह देशमुख यांनी हरणाई
सहकारी सूत गिरणीच्या माध्यमातून वडूज येथे आयोजित
केलेल्या राज्यस्तरीय हरणाई कृषी प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी
ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीपराव
येळगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सौ. इंदिरा
घार्गे, अशोकराव गोडसे, नंदकुमार गोडसे, भाजपचे विकल्पशेठ
शहा, रासपचे मामूशेठ वीरकर, डॉ. विवेक देशमुख, चंद्रकांत काळे, बबनराव कदम, मानाजी घाडगे, रणधिर जाधव, सचिन माळी, अभय देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी गुरूदत्त काळे, आर.एन.जितकर, किरण उदमले, डॉ.महेश गुरव,भरत जाधव, बाबासाहेब माने, डॉ. संतोष गोडसे, विजय शिंदे, परेश जाधव, मोहनराव देशमुख, सत्यवान कमाने, अमर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार पाटील म्हणाले, वडूजसारख्या ग्रामीण भागांत कृषी
प्रदर्शनाचा पहिलाच प्रयोग होत आहे आणि त्याच्या उदघाटनाला
पाहुणा म्हणून येण्याचा योग आला ही आपल्या दृष्टीने आनंदाची
गोष्ट आहे. अलीकडच्या काळात वेगवेगळ्या पाणी योजनांमुळे
बागायती शेती क्षेत्र वाढणार आहे. अश्या परिस्थितीत शेतीला
चांगल्या तंत्रज्ञानाची गरज आहे. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून
शेतकऱ्यांची ही गरज भागणार आहे. या भागाचे अनेक महत्वाचे
प्रश्न प्रलंबीत आहेत ते सोडविण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी
पक्षीय मतभेद विसरून एकत्र यावे. खासदार पाटील यांनी भाषणात माजी आमदार डॉ. येळगावकर यांनी भाषणात व्यक्त केलेल्या समस्यांच्या गाऱ्हाण्याच्या सवालात त्यांच्या खास शैलीत जवाब दिला.
डॉ. येळगावकर म्हणाले, सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी आपण
गेली अनेक वर्षे संघर्ष करीत आलो आहोत. शेती पाण्याच्या
बाबतीत प्रस्थापितांशी संघर्ष केल्यानेच मोठे परिणाम भोगावे
लागले. खासदार पाटील यांनी या भागाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा. बोगद्यातून पाणी नेण्याऐवजी नदी जोड प्रकल्प राबवावा असे मत मांडले. तसेच गेली अनेक वर्षे रणजितसिंह देशमुख वेगवेगळे विधायक प्रयोग राबवून खटाव माणमध्ये विकासाचे चांगले प्रकल्प, योजना राबवत आहेत. लोकांनी आता खोटे बोल पण रेटून बोल या प्रवृत्तींने वागणाऱ्यांना बाजूला ठेवून विधायक काम करणाऱ्यांची पाठराखण करावी
राजेंद्र पवार यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. महेश गुरव यांनी आभार
मानले.
ताप आणि घाम…
खासदार पाटील म्हणाले, आजारी रूग्ण डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात घाम आला की ताप कमी होईल. त्यातूनही एक रूग्ण घाम येत नसल्याची तक्रार घेऊन गेला. त्यावर डॉक्टर म्हणाले, मग बाहेर जावून बिल घ्या ते पाहील्यानंतर तुम्हाला नक्कीच घाम येईल. खासदारांच्या या मार्मीक चिमट्याने जाणकार उपस्थितांत हशा पिकला.