
महाराष्ट्र केसरी कुस्तीचा अंतिम सामना हा कोल्हापूर विरुद्ध मुंबई पार पडला.
मिलिंद लोहार सातारा
सातारा- राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुलात झाली.कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने मुंबई पूर्वच्या विशाल बनकर याच्यावर कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि मुंबईचा विशाल बनकर यांच्यात अंतिम लढत झाली.
या लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या विशाल बनकरचा पराभव करत ५ विरुद्ध ४ गुण फरकाने विजय मिळवून महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आज आपले नाव कोरले.सहा मिनिटांच्या या लढतीत पृथ्वीराज पाटील याने बाजी मारत ५-४ नं मात केली आहे. जवळपास २१ वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली आहे. त्यामुळे सध्या कोल्हापूरात जल्लोषाचं वातावरण आहे.
कोरोना महासाथीच्या रोगामुळे गेल्या दोन वर्षापासून या स्पर्धा पार पडल्या नव्हत्या. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेकडे सगळ्यांच्या नजरा लागून होत्या. आता निर्बंधमुक्तीनंतर जनजीवन रुळावर येत असून ही स्पर्धाही साताऱ्यात उत्साहात पार पडली.
पृथ्वीराज पाटील ९५ किलो वजनी गटात ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी ठरला. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.