कोरेगाव भीमा – दिनांक ८ एप्रिल

कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी नं.२ ची निवडणूक बिनविरोध पार पडली असून बबूषा आनंदराव ढेरंगे तर व्हॉईस चेअरमन पदी सारिका संभाजी गव्हाणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. कोरेगाव भीमा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी नं.२ ची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली होती यावक्री श्री भैरवनाथ ग्रामविकास सहकार पॅनल ने १३ जागा जिंकत आपले वर्चस्व निर्विवाद सिद्ध केले होते. माजी सरपंच आबासाहेब गव्हाणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पॅनल निवडून आला आहे.
कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी , वाडा पुनर्वसन येथील शेतकऱ्यांची विश्वसनीय संस्था असून तीन गावांची असणारी सोसायटीच्या चेअरमनपदी बबुशा ढेरंगे व व्हॉईस चेअरमन पदी सारिका संभाजी गव्हाणे यांची निवड बिनविरोध झाली असून बबुशा ढेरंगे हे पहिल्यांदाच निवडणूक लढले व निवडून आले तसेच पहिल्यादांच त्यांना चेअरमन पदाची संधी मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. व्हॉईस चेअरमनपदी सारिका गव्हाणे यांची निवड झाल्याने शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी नवनिर्वाचित संचालक महादेव फडतरे, ,नागेश गव्हाणे, विमल ज्ञानेश्वर शिंदे तसेच संतोष माकर,अशोक गव्हाणे,अनिल गव्हाणे,अशोक नाबगे, नागनाथ गव्हाणे ,प्रवीण गव्हाणे,पंडित केशव फडतरे, रामदास गुलाब कांबळे ,दत्तात्रय वाडेकर, पंडित फडतरे यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग.द. पुंड यांनी काम पाहिले .
यावेळी , माजी सरपंच आबासाहेब गव्हाणे,सरपंच अमोल गव्हाणे,माजी पंचायत समिती सदस्य पि के गव्हाणे, भाऊसाहेब गव्हाणे, माजी उपसरपंच राजेंद्र ढेरंगे ,नारायण फडतरे, माजी सरपंच संदीप ढेरंगे,मधूकर गव्हाणे, रमेश गव्हाणे , स्वराज्य राष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे,उद्योजक सुधाकर ढेरंगे, रामदास ढेरंगे,दत्तात्रय गव्हाणे,संभाजी गव्हाणे, माजी चेअरमन ज्ञानेश्वर गव्हाणे, नितीन गव्हाणे, नारायण गव्हाणे, बापूसाहेब गव्हाणे,दत्तात्रय गव्हाणे,तुषार गव्हाणे,पोलीस पाटील मालन गव्हाणे, स्वाती सवाशे, कविता गव्हाणे ,नेहा गव्हाणे, अनिल कुंभार उपस्थित होते.
सर्वांच्या सहकार्याने आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आहे.संस्थेच्या विकासासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार आहे.संस्थेचा नावलौकिक वाढवण्यासाठी काम करण्यात येणार येणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे – बबुशा ढेरंगे,नवनिर्वाचित चेअरमन विविध कार्यकारी सहकारी संस्था कोरेगाव भीमा, नं.२