श्री खंडेरायाची आरती करण्याचा मान नवनिर्वाचित चेअरमन ऋषी राज पवार यांना देत सत्कार करण्यात आला.
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर)महाराष्ट्राचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाचा अवतार कार्य असणारा धार्मिक चंपाषष्ठी षडारात्र उत्सवाला गुरुवार पासून (दिनांक २४ नोव्हेंबर) पासून सुरुवात झाली. कोरेगाव भीमा येथील श्री मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या उत्सवाला मोठ्या भक्तिभावाच्या व उत्सवाच्या वातावरणात सुरुवात झाली यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येऊन चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. सहा दिवस चालणार्या या उत्सवात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या व म्हाळसा, बाणुबाई देवीच्या उत्सव मूर्तींची घटस्थापना केली आहे. या सहा दिवसात मार्तंडविजय ग्रंथाचे पारायण, वाघ्या मुरुळी व लोककलावंतांचा जागर, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन ऋषीराज पवार,सरपंच अमोल गव्हाणे व ग्रामस्थांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच नवनिर्वाचित चेअरमन ऋषीराज पवार यांचा सत्कार खंडोबा मंदिर सेवेकरी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देत करण्यात आला. यावेळी मंदिराचे सेवेकरी पांडूरंग मारुती ढेरंगे, पोपट चव्हाण , राजाराम गव्हाणे, बबन घावटे, साहेबराव सव्वाशे, खंडेराव चकोर , श्रीरंग काशिद , किरण सव्वाशे, संपत भांडवलकर, विकि शिंन्दे, माजी ग्राम पंचायत सदस्य बाळासाहेब ढेरंगे, पंडित ढेरंगे, दीपक गव्हाणे, राजाराम फडतरे, सोमनाथ मांजरे विलास पवार, संतोष माने, आरविंद शिंन्दे व ग्रामस्थ होते.
