
कोरेगाव भीमा – दिनांक १७ जून बहुप्रतिक्षीत महाराष्ट्र बोर्डाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील श्री छत्रपती संभाजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज १० विच्या निकालामध्ये मुलींचा डंका वाजला असून शाळेचा निकाल ९४.०७ लागला आहे. या निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला.
दहावीचा निकाल उत्कृष्ट लागला असून एकूण १४३ परीक्षार्थीं उत्तीर्ण झाले आहे. प्रथम क्रमांक काटे अश्विनी अभय (८९.८०%),द्वितीय क्रमांक बारवकर वैष्णवी संतोष ( ८८%)तृ मनतीय क्रमांक -शेख सिमरन जयउद्दीन-(८७.२०%)चौथा -कांबळे सौरभ राजेश ( ८६.८०%)पाचवा-राऊत दीपक पांडुरंग(८६.२०%). यांनी यश संपादन केलं आहे.
ग्रामस्थांनी विद्यार्थी पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे नारायणराव फडतरे, रवींद्र फडतरे ,प्राचार्य एम.टी.कुंभारकर ,प्र.पर्यवेक्षक बेल्हेकर बी.पी ,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.