सरपंच विक्रम गव्हाणे यांच्यासह वॉर्ड क्रमांक चारच्या ग्राम पंचायत सदस्यांचे दुर्लक्ष , विद्यार्थी,नागरिक कामगार यांच्या आरोग्याशी होतोय खेळ
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील पिंपळे जगताप वळणाला कचऱ्याचा ढीगारा साठला असून यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थी,नागरिक ,रुग्ण व कामगारांना त्रास होत असून ग्राम पंचायतीचे याकडे मात्र दुर्लक्ष होत असून येथेच असणाऱ्या एस सी बीच्या डीपी भोवताली कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून येथील ग्राम पंचायत सदस्यांचे दुर्लक्ष तर होतच आहे पण ग्राम पंचायतीच्या माध्यमातून येथील स्वच्छता करण्याचं साधं काम त्यांना करता येऊ नये याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोरेगाव भीमा येथील पिंपळे जगताप रस्त्याच्या वळणाला मोठ्या प्रमाणावर कचरा साठला असून या रस्त्यावरून श्री छञपती संभाजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी, अल अमीन कॉलेज, इम्पेटेटस स्कूल, ग्लोरी इंग्लिश मिडीयम स्कूल, विद्यार्थी व विद्यार्थिनी, कंपनी कामगार, पुढे शंभू नगरी लोकवस्ती, आदिराज प्लॉटिंग, पठार वस्ती, वढू बुद्रुक,पिंपळे जगताप नागरिकांना येथून प्रवास करताना कचऱ्याच्या बाजूने प्रवास करावा लागत आहे.
कोरेगाव भिमा ( ता.शिरूर) येथील ग्राम पंचायतीच्या वतीने मूलभूत सेवा सुविधा तरी नागरिकांना मिळतात का नाही ? असा प्रश्न निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या भेडसावत असून कचरा व्यवस्थापन करण्याबाबत ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. कचऱ्यापासून कदाचित नागरिकांना आजारांच्या साथीला सामोरे जावे लागू शकते ,येथून विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना शाळेत जावे लागत आहे तर कामगारांना कामावर जावे लागते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
याबाबत कोरेगाव भिमा ग्रामपंचायतीचे सरपंच विक्रम गव्हाणे व ग्राम पंचायत सदस्य केशव फडतरे ,माजी उपसरपंच शिल्पा गणेश फडतरे, शैला गणेश फडतरे व ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी नागरिकांच्या, विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी येथे तातडीने स्वच्छता करण्यात येईल की ? नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ असाच पाहत राहत हातावर हात ठेवणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

नागरिकांनी आपले घर, अंगण व परिसर जसा स्वच्छ ठेवतो तसाच रस्ता व इतर रहदारीच्या ठिकाणी स्वच्छता ठेवायला हवी.आपल्या घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये, घर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करणारे मात्र परिसर घान करत आहे ही विकृत प्रवृत्ती सोडायला हवी.कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडीचा वापर करण्यात यावा.कचरा टाकणारे जे नागरिक अथवा कामगार आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करायला हवी. तसेच येथे कचरा कुंडी ठेवायला हवी. स्वच्छ परिसर हे गावचे वैभव आहे यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.