कोरेगाव भीमा ,- सणसवाडी ( ता.शिरूर) येथे राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ यांच्या वतीने कामगार दिनानिमित्त भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन कृष्णलीला मंगल कार्यालयात सणसवाडी येथे करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ विधीतज्ञ व सामाजिक कार्यकर्ते ॲड असीम सरोदे मार्गदर्शन करणार आहे.
राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ कामगारांसाठी एकी हेच बळ प्रत्यक्ष कृतीत आनत कामगारांच्या न्याय हक्कासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतात.कामगारांना विविध सेवा सुविधा मिळाव्यात तसेच त्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करत असतात.कामगारांच्या अडीअडचणीच्या काळात ठामपणे उभे राहत त्यांना आधार देत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांच्याशी कौटुंबिक नाते जपले आहे यामुळे पुणे जिल्ह्यातील विविध कामगार संघटना व कामगार या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार असल्याची माहिती श्रमिक एकता संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र दरेकर यांनी दिली.
यावेळी मुख्य मार्गदर्शन ज्येष्ठ विधितज्ञ ॲड असीम सरोदे यांचे मार्गदर्शन करणार असून यावेळी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष ॲड किशोर ढोकले, उपाध्यक्ष राजेंद्र दरेकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय येळवांडे , सणसवाडीचे माजी सरपंच रमेश सातपुते, जनरल सेक्रेटरी अविनाश वाडेकर, खजिनदार गणेश जाधव, सह सेक्रेटरी राजाराम शिंदे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सुवर्णा रामदास दरेकर सरपंच, दत्तात्रेय नामदेव हरगुडे उपसरपंच, सुनंदा नवनाथ दरेकर माजी सरपंच, स्नेहल राजेश भुजबळ माजी सरपंच, संगीता नवनाथ हरगुडे माजी सरपंच, शशिकला रमेश सातपुते ग्रामपंचायत सदस्य, रूपाली दगडू दरेकर ग्रामपंचायत सदस्य, विजयराज दत्तात्रेय दरेकर माजी उपसरपंच सागर प्रकाश दरेकर माजी उपसरपंच, अक्षय बाळासाहेब कानडे ग्रामपंचायत सदस्य,यांच्यासह विविध मान्यवर कामगार नेते, कार्यकर्ते व समाज सेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
I have to thank you for the efforts youve put in writing this blog. Im hoping to check out the same high-grade blog posts by you later on as well. In fact, your creative writing abilities has encouraged me to get my own website now 😉