कै .नवनाथ साळुंखे यांच्या स्मरणार्थ ९० रक्तदात्यांनी केले रक्तदान
हवेली तालूका: प्रतिनिधी

हवेली (कदमवाकवस्ती ): पुर्व हवेली डॉक्टर असोसिएशन पुरस्कृत व अक्षय ब्लड बॅक आयोजित कवडीपाट अंबिका माता मंदिर येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी ९० रक्तदात्यांनी सामाजिक उत्तरदायित्व जपले.
कै. नवनाथ साळुंखे यांच्या स्मरणार्थ अंबिका माता मंदीराच्या सर्व सभासदांनी शिबीराचे आयोजन केले होते . या शिबीराचे उद्घाटन पुर्व हवेली अध्यक्ष डॉ वनिता काळभोर व नवपरिवर्तन फांऊडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष डॉ वनिता काळभोर, सचिव डॉ नितीन तांदळे, खजिनदार डॉ सुनिल गायकवाड, डॉ नेहा मटकर, डॉ. नितीन चौधरी, डॉ रतन काळभोर, डॉ प्रविण धर्माधिकारी ,ग्रामपंचायत सदस्य सचिन दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कदम, दिपक काळभोर तसेच डाॅक्टर असोशिएशन च्या सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते बरोबर. या शिबिराचे आयोजन अंबिका नवरत्न मित्र मंडळ कवडी पाट ग्रामस्थ यांनी केले होते.