
हवेली प्रतिनिधी – सुनील थोरात
मांजरी बुद्रुक – दिनांक ७ फेब्रुवारी
मांजरी बुद्रुक ( ता.हवेली) येथे सामाजिक बांधिलकी जपत ऊस तोड कामगारांना मदत किटचे वाटप करण्यात आले . यावेळी ऊसतोड कष्टकरी गरजू गरीब कुटुंबांना पोटभर अन्न मिळावे. रहायला स्वतःचे घर असावे आणि पुरेसे चांगले कपडे असावे म्हणून प्रत्येकाने खारीच्या वाट्या ने मदत करावयाला हवी असे अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांनी आवाहन केले.
आपण केलेली मदत संस्थेच्या वतीने ऊसतोड बांधवांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगार महिलांना साड्या, पुरुष व लहान मुलांना कपडे वाटण्यात आल्याचे बेल्हेकर यांनी सांगितले.
आपल्या परिसरात अनेक उच्चभ्रू सोसायट्या आहेत. यामध्ये राहणारे रहिवाशी सतत नवनवीन महागडी कपडे वापरतात. त्यांच्याकडे सुस्थितीत वापरण्याजोगे कपडे आम्ही संकलित करतो. ह्या कपड्यांची मुले, महिला व पुरुष अशी वर्गवारी केली जाते. गरजू बांधव ज्या ठिकाणी आहे तिथं याचे वाटप केले जाते. गेली बारा वर्ष हा संस्थेचा उपक्रम चालू असून गरजू कुटुंबांना संस्थेने कपडे वाटप केली आहेत.
या सामाजिक उपक्रमाचे संयोजन करतात उज्वला टिळेकर,शुभांगी शिंदे, मिनाक्षी कुमकर, रेश्मा लोणारे, विनोद गदादे, अतुल रासकर, गोरख आडेकर, ओजस बेल्हेकर,महेश गळगे, डॉ.गणेश सातव, प्रदीप मगर हे करत असतात.