
पुणे जिल्हा नियोजन समिती पंडित दरेकर यांचे मोलाचे योगदान
कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच , नागरिकांना उन्हाने हैराण करून सोडले आहे तर ऐन उन्हाळ्यात पाणी संकट दिसत असतानाच पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर यांनी आमदार अशोक पवार यांना सणसवाडी ग्रामस्थ व उद्योग व्यवसायांना पाण्याची मोठ्या प्रमाणात अवशक्यात असल्याने पाण्याच्या तुटवड्याच्या समस्येबाबत माहिती देत पाझर तलावात पाणी सोडण्याची मागणी केली त्यावर आमदार अशोक पवार संबधित विभागाला सूचना केल्याने तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असल्याने नागरिकांनी याबाबत आनंद व्यक्त करत आमदार अशोक पवार व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांचे आभार मानले.
चास – कमान लघुपाटबंधारे विभागातून नागरिकांसह शेतीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नागरिकांसह परिसरातील शेती,उद्योगांना संजिवनी मिळाली आहे. पाझर तलावाच्या पाण्यावर नागरिकांसह ,पशू पक्षी व प्राण्यांना पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागले असते पण ही समस्या येण्यापूर्वीच पंडित दरेकर यांनी आमदार पवार यांच्या ही बाब निदर्शनास आणल्याने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ग्रामस्थांना पाणी उपलब्ध झाले असून पाण्याच्या गंभीर समस्येला सोडवण्यात मोलाचे योगदान दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पाझर तलावात आलेल्या पाण्याची पाहणी करण्यात आली त्यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर ,माजी चेअरमन सुहास दरेकर व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दरेकर उपस्थित होते.
पाझर तलावाची पाणी पातळी घटली होती, उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असून नागरिकांनी समस्या मांडल्यावर याबाबत आमदार अशोक पवार यांना माहिती दिली असता त्यांनी तातडीने याबाबत चास कमानचे पाणी उपलब्ध करून दिल्याने आम्ही ग्रामस्थ त्यांचे आभारी आहोत.
पंडित दरेकर ,सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती