राव लक्ष्मी फाउंडेशनच्या डोळे तपासणी, मोतीबिंदू भिंगारोपन व मोफत चष्मे वाटप शिबिराचा अनेक वृद्धांना फायदा
कोरेगाव भीमा – पुणे ( ता.शिरूर) राव लक्ष्मी फाऊंडेशन व एच व्ही देसाई रुग्णालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या डोळे तपासणी, मोतीबिंदू भिंगारोपन व मोफत चष्मे वाटप शिबिराचा अनेक वृद्धांना फायदा झाला असून यातील एका वृद्धाने मला काहीच दिसत नव्हते , येताना आधार घेऊन यावे लागले पण आता डोळ्यांनी सर्व दिसत आहे . ऑपरेशन नंतर दिसायला लागले असून आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांचे आभार मानले.
यावेळी आमदार अशोक पवार यांनी डोळ्यांची कशी काळजी घ्यायची, सूर्यप्रकाशात चश्मा काढायचा नाही तसेच एच व्ही देसाई हॉस्पिटलच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार हे शिरूर हवेली मतदार संघाला आपल्या कुटुंबाप्रमाने जपत असता याची पुन्हा एकदा ५० वृद्धांना अनुभव आला असून आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांनी लग्नाच्या ३७ व्या वाढदिवसानिमित्त डोळ्यांचे ऑपरेशन झालेल्या वृद्धांची भेट घेत आपुलकीने तब्येतीची ,सोयीसुविधा व आता कसं दिसतंय अशी विचारपूस करत वृद्धांशी हितगुज साधले.
आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार हे राव लक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. नुकताच स्वर्गीय माजी आमदार रावसाहेब पवार यांच्या १०६ व्या जयंतीचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील वयोवृध्द नागरिकांची नित्तांत गरज ओळखून एच व्ही देसाई रुग्णालयाच्या माध्यमातून डोळे तपासणी, मोतीबिंदू भिंगारोपन व मोफत चष्मे वाटप शिबिराचे विविध गावात आयोजन करण्यात आले असल्याने याचा अनेक नागरिकांना लाभ झाला.
आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांनी मतदार संघातील विकास कामांच्या बाबतीत महत्वपूर्ण काम करत असून वी इध विकासकामे करत नागरिकांना भौतिक सोयीसुविधा या गुणवत्ता दर्जेदार असण्याबरोबरच त्यांच्या छोट्या मोठ्या सुख दुखामध्ये सहभागी होत एक माणूसकीचे व जिव्हाळ्याचे नाते जपले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्यांच्या पाठीशी कायम उभे राहत असतात.माजी सभापती सुजाता पवार यांनी वृद्धांशी संवाद साधत अपलुकिने विचारपूस केल्याने वृद्धांनी आनंद व्यक्त केला.
Very well presented. Every quote was awesome and thanks for sharing the content. Keep sharing and keep motivating others.